Advertisement

पनवेल महापालिका हद्दीत बुधवारी २०७ नवीन कोरोना रुग्ण

पनवेल महापालिका हद्दीत बुधवारी (१६ सप्टेंबर) २०७ नवीन कोरोना रुग्ण आढळले. २०७ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

पनवेल महापालिका हद्दीत बुधवारी २०७ नवीन कोरोना रुग्ण
SHARES

पनवेल महापालिका हद्दीत बुधवारी (१६ सप्टेंबर) २०७ नवीन कोरोना रुग्ण आढळले.  २०७ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तसंच ४ मृत्यूंची नोंद झाली असून यामध्ये पनवेलमधील २ तसेच कामोठे आणि खांदा कॉलनी येथील प्रत्येकी रूग्णाचा समावेश आहे. 

पनवेल महापालिका हद्दीतील आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये पनवेलमधील ४०, नवीन पनवेलमधील २८, खांदा कॉलनीतील १०, कळंबोली-रोडपाली येथील ३३,  कामोठ्यातील ५१, खारघरमधील ४३ रुग्णांचा समावेश आहे. 

बरे झालेल्या रूग्णांमध्ये पनवेलमधील ५१,  नवीन पनवेलमधील ३९, कळंबोली-रोडपाली येथील २४, कामोठ्यातील ४८, खारघरमधील ३८,  तळोजा येथील ७ रुग्णांचा समावेश आहे. 

आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण १५५४२ कोरोनाबाधित रूग्णांपैकी १३०४६ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून ३५६ जणांचा  मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे २१४० ॲक्टीव्ह रूग्ण आहेत.



हेही वाचा -

२ पेक्षा अधिक मजल्यांवर कोरोना रुग्ण आढळल्यास इमारत सील

मुंबईच्या 'या' परिसरात कोरोनामुळं सर्वाधिक मृत्यू



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा