Advertisement

२२ दिवसांच्या बाळाच्या शरीरात सुई, वाडियामध्ये यशस्वी शस्त्रक्रिया


२२ दिवसांच्या बाळाच्या शरीरात सुई, वाडियामध्ये यशस्वी शस्त्रक्रिया
SHARES

जन्मानंतर लस टोचताना बाळाच्या मांडीत सुई राहिल्याची धक्कादायक बाब पुढे अाली आहे.  काही दिवसांनंतर बाळाच्या मांडीला सूज आल्याने पालकांनी रुग्णालयात धाव घेतली. एक्स रे आणि अन्य चाचण्या केल्या असता डॉक्टरांना बाळाच्या मांडीत सुई असल्याचं अाढळून अालं. अखेर २२ दिवसाच्या या बाळाच्या मांडीतून ही सुई काढण्यात वॉडिया हॉस्पिटलमधील डॉक्टरांना यश आलं आहे.ताप आणि मांडीला सूज 

पनवेलमधील एका नर्सिंग होममध्ये आस्था सुधाकर पाष्टे या महिलेने बाळाला जन्म दिला.  प्रसूतीनंतर बाळाला सामान्य औपचारिकता म्हणून लस टोचावी लागते. यावेळी लस टोचताना सुई अातच राहिली. मात्र, हे कोणाच्याही लक्षात अालं नाही.  काही दिवसानंतर बाळाला ताप अाला आणि मांडीवर सूज दिसून आली. त्यामुळे पालकांनी बाळाला रुग्णालयात नेले असता त्याच्या उजव्या बाजूच्या मांडीला ऑस्टिओमायलायटिस असल्याचं निदान करण्यात आलं. त्यानंतर या बाळाला परळ येथील वॉडिया हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं.


सीटी स्कॅनमध्ये सुई अाढळली

वाडियामध्ये बाळावर ऑस्टिओमायलायटिससाठी उपचार सुरू करण्यात आले. तेव्हा एक्स-रे रिपोर्टमध्ये बाळाच्या डाव्या मांडीत बाहेरील वस्तू असल्याचं अाढळून अालं. त्यानंतर अाणखी केलेल्या चाचण्यांमध्येही ती वस्तू  दिसत होती. त्यामुळे सीटी स्कॅन करण्याचा निर्णय घेण्यात आला. सीटी स्कॅनच्या रिपोर्टनुसार ती वस्तू लसीकरणादरम्यान वापरण्यात आलेली सुई असल्याचं निश्चित झालं. त्यानंतर बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.


२ सेंटीमीटरची सुई 

या शस्त्रक्रियेबाबत वाडिया हॉस्पिटलमधील बालशल्यविशारद डॉ. प्रज्ञा बेंद्रे म्हणाल्या, तुटलेली सुई २२ दिवस बाळाच्या शरीराच्या आत होती. बाळाला ती टोचत नसावी किंवा ते वेदना व्यक्त करू शकत नसावं. ही सुई बाळाच्या शरारीतून काढण्यात आली अाहे. शरीरातील वस्तू शोधण्यासाठी बाळावर इन्ट्रा-ऑपरेटिव्ह शस्त्रक्रिया करण्यात आली. ही सुई नक्की कुठे आहे, ते शोधून काढणं कठीण होतं. सी-आर्म गायडन्स लोकलायझेशन्सचा उपयोग करून ती सुई काढण्यास दोन तासांचा कालावधी लागला. ही २ सेंटीमीटर लांबीची सुई डाव्या सांध्याच्या प्रावरणाला चिकटलेली होती. शस्त्रक्रियेनंतर बाळाची प्रकृती सामान्य अाहे.हेही वाचा -

उपचार कामामध्ये पण औषधे बॉम्बे हॉस्पिटलमधून

क्षयरोग रुग्णांच्या नोंदणीसाठी 'डिझबोर्ड' अॅप

संबंधित विषय