Advertisement

क्षयरोग रुग्णांच्या नोंदणीसाठी 'डिझबोर्ड' अॅप


क्षयरोग रुग्णांच्या नोंदणीसाठी 'डिझबोर्ड' अॅप
SHARES

भारतात क्षयरोग (टीबी)  रुग्णांचा अाकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मात्र, सरकारकडे टीबी झालेल्या रुग्णांचा नेमका आकडा उपलब्ध नाही. क्षयरोग रुग्णांची नेमकी संख्या मिळण्यासाठी  'डिझबोर्ड' नावाचं नवीन अॅप्लिकेशन सुरु करण्यात आलं अाहे.  या अॅप्लिकेशनमार्फत डॉक्टरांना टीबी रुग्णांची नावनोंदणी करता येणार अाहे. गुरूवारपासून हे अॅप्लिकेशन डॉक्टरांना वापरता येणार आहे. टीबी रुग्णांच्या नावनोंदणीसाठी वापरले जाणारं हे भारतातील पहिलं अॅप्लिकेशन असणार आहे.


नेमका अाकडा मिळणार 

सण २०२५ पर्यंत 'क्षयमुक्त भारत' चं स्वप्न बाळगत असलेल्या सरकारने यासंदर्भात काम सुरु केलं आहे . भारतात एकूण २७ लाख ९ हजार इतके क्षयरोग रुग्ण आहेत. पुढच्या वर्षी याचा आकडा निश्चितच वाढेल. टीबीच्या रुग्णांची तंतोतंत माहिती शासनाला पोचवण्यासाठी असीम सिस्टीम (इंडिया) ने 'डिझबोर्ड' अॅप्लिकेशन सुरु केलं आहे. यामध्ये डॉक्टरांना त्यांच्याजवळ आलेल्या टीबी रुग्णांची माहिती शासनापर्यंत पोचवणं सोपं होणार अाहे.


नोंद थेट सरकारकडे

या अॅपची माहिती देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत असीम सिस्टीम (इंडिया) चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. विशाखदत्त पाटील म्हणाले की, क्षयरोग रुग्णांची नोंदणी नीट होत नसल्याने अनेक  रुग्ण उपचारापासून वंचित राहतात. शिवाय सरकारलाही रुग्णांचा तंतोतंत आकडा मिळत नसल्याने औषधांचा पुरवठा करणं कठीण जातं. या अॅप्लिकेशनद्वारे डॉक्टर रुग्णांची नोंद करतील आणि ही नोंद थेट सरकारकडे जाईल.


लांबलचक प्रक्रियेला फाटा

 या अॅप्लिकेशनमध्ये डॉक्टर आपल्या नावाने साइन इन करू शकतात. अॅप्लिकेशनमध्ये डॉक्टरांची संपूर्ण माहिती तपासून त्यांची नोंदणी होणार अाहे. पूर्वी डॉक्टरांना शासनाचा नावनोंदणीचा फॉर्म त्यांच्या वेबसाइटमधून डाउनलोड करावा लागे. त्याची छापील प्रत घेऊन मग तो फॉर्म भरला जायचा. त्यानंतर टीबी रुग्णांची नोंद सरकारकडे व्हायची. अशा लांबलचक प्रक्रियेला डिजिटल रूप देऊन हे अॅप्लिकेशन बनवलं आहे.  यामध्ये शासनाचा फॉर्म डिजिटली भरता येणार आहे. 



हेही वाचा - 

टाटा हाॅस्पिटलच्या नावानं फेक मेसेज व्हायरल

मुंबईत वाढतोय टीबीचा धोका- देवेंद्र फडणवीस




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा