Advertisement

मुंबईत वाढतोय टीबीचा धोका- देवेंद्र फडणवीस


मुंबईत वाढतोय टीबीचा धोका- देवेंद्र फडणवीस
SHARES

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र टीबीच्या विळख्यात सापडण्याची भीती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत मंगळवारी व्यक्त केली. ज्याप्रमाणे पोलिओ भारतातून समूळ नष्ट झाला त्याचप्रमाणे केंद्र सरकार २०२५ पर्यंत टीबीमुक्त भारत करण्यासाठी प्रयत्न करत आहे. एप्रिल २०१७-१८ या वर्षभरात मुंबईत एकूण ४५ हजार टीबी रुग्णांची नोंद झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.



मुख्यमंत्री पुढे म्हणालेे की, “राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत खाजगी रूग्णालयातील ४८९१ टीबीच्या रूग्णांची नोंदणी करून त्यांच्यावर आधुनिक उपचार पद्धतींद्वारे उपचार सुरु आहेत. त्याशिवाय एम.डी.आर निदान केंद्रांची संख्या वाढवण्यात आल्याने एम.डी.आर टीबी रूग्णांचं वेळेवर निदान होण्यात मदत मिळत आहे.”

विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याबाबत शिवडी टीबी रुग्णालय समूहाचे अधिक्षक डॉ. ललितकुमार आनंदे यांनी सांगितलं की, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने टीबीमुक्त भारत २०३० पर्यंत होऊ शकतो, असं सांगितलं होतं. पण पंतप्रधानांनी हे कठीण आव्हान स्वीकारून २०२५ पर्यंत भारताला टीबीपासून मुक्त करू असं सांगितलं. टीबीमुक्त भारत करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करायला हवे."



हेही वाचा-

धक्कादायक! मुंबईत वर्षभरात दगावली ४८३ बालकं

किडनी निकामी झालेल्या रुग्णांसाठी विशेष डायलिसिस विभाग सुरू



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा