Advertisement

टाटा हाॅस्पिटलच्या नावानं फेक मेसेज व्हायरल


टाटा हाॅस्पिटलच्या नावानं फेक मेसेज व्हायरल
SHARES

सोशल मीडियाच्या जमान्यात सध्या कोणत्याही गोष्टी काही क्षणातच व्हायरल होतात. अभिनेता इरफान खान आणि अभिनेत्री सोनाली बेंद्रे सध्या कर्करोगाशी झुंज देत अाहेत. याचाच धागा पकडत महिलांनी कर्करोगाच्या रुग्णाची कशी काळजी घ्यावी, याचा एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. धक्कादायक बाब अशी की या व्हायरल मेसेजमध्ये मुंबईतील टाटा कॅन्सर सेंटरनं ही माहिती दिली असल्याचं म्हटलं आहे. मात्र, हा मेसेज फेक असून तो टाटा कॅन्सर सेंटरनं पाठवला नसल्याचं उघडकीस अालं अाहे.


स्तनाच्या कर्करोगासंबंधी मेसेज

कर्करोगासंदर्भात गेल्या २ दिवसांपासून एक मेसेज व्हायरल होत आहे. यामध्ये स्तनाच्या कर्करोगापासून वाचण्यासंबंधी काही माहिती दिली आहे. आश्चर्याची गोष्ट अशी की ही माहिती मुंबईतील टाटा कॅन्सर सेंटरनं दिली आहे असं यामध्ये नमूद करण्यात अालं अाहे.  व्हाॅट्सअपवर सध्या हा मेसेज झपाट्याने वायरल होत आहे. मात्र, अशी माहिती मेसेज टाटा कॅन्सर सेंटरनं जारी केली नाही, असं सेंटरच्या जनसंपर्क अधिकाऱ्याने स्पष्ट केलं अाहे.  


सोनाली बेंद्रेवरील मेसेजही फेक

सोनाली बेंद्रेला हाय ग्रेड कॅन्सर झाला असल्याची माहिती तिनं तिच्या सोशल मीडियावरून दिली आणि तिच्या फॅन्सना धक्काच बसला. सोनालीला नक्की कोणता कॅन्सर झाला आहे हे अद्यापही उघडकीस अालेलं नाही. ती सध्या उपचाराकरता न्यूयॉर्कमध्ये आहे. सोनालीला कर्करोग झाला आहे हे समजताच काही नेटकऱ्यानी तिच्यासंदर्भात चुकीचे मेसेज व्हायरल करण्यास सुरूवात केली. काही दिवसांपूर्वी सोनालीला सर्व्हायकल कॅन्सर झाला आहे असा मेसेज व्हायरल होता होता. मात्र, हा मेसेजही फेक असल्याचं दिसून अालं.



हेही वाचा -

मुंबईत वाढतोय टीबीचा धोका- देवेंद्र फडणवीस

जगजीवन राम रुग्णालयात पहिली अवयवदानाची शस्त्रक्रिया यशस्वी




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा