Advertisement

पनवेल महापालिका हद्दीत मंगळवारी अवघे २३ नवीन कोरोना रुग्ण

पनवेल महापालिका हद्दीत मंगळवारी (२२ डिसेंबर) २३ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून ३३ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

पनवेल महापालिका हद्दीत मंगळवारी अवघे २३ नवीन कोरोना रुग्ण
SHARES

पनवेल महापालिका हद्दीत मंगळवारी  (२२ डिसेंबर) २३ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून ३३ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तसेच नवीन पनवेल आणि खारघर येथील प्रत्येकी एका रूग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे.  

पनवेल महापालिका हद्दीतील आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये पनवेलमधील २,  नवीन पनवेल ७, खांदा काॅलनी १, कामोठे ३, खारघर  येथील ९ रुग्णांचा समावेश आहे. 

बरे झालेल्या रूग्णांमध्ये पनवेलमधील पनवेल ४, नवीन पनवेल ७, कळंबोली २, कामोठे ५, खारघर येथील १५  रुग्णांचा समावेश आहे.

आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण २७१८० कोरोनाबाधित रूग्णांपैकी २६२४८ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून ५९५ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे ३३७ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत. 



हेही वाचा -

राजहट्ट व बालहट्टासाठीच मेट्रो कारशेडची जागा बदलली- किरीट सोमैय्या

ब्रिटन, आखाती देशांतून येणाऱ्या प्रवाशांना सक्तीने क्वारंटाइन, मुंबई महापालिकेचा निर्णय



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा