Advertisement

नवी मुंबईत मंगळवारी २३९ नवीन रुग्ण

नवी मुंबईत मंगळवारी २३९ नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

नवी मुंबईत मंगळवारी २३९ नवीन रुग्ण
SHARES

नवी मुंबईत मंगळवारी २३९ नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नवी मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा आता ९९१७ पर्यंत पोहोचला आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे नवी मुंबईतील ३१० नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

नवी मुंबईत गेल्या ५ दिवसांमध्ये १३९९ रुग्ण सापडले आहेत. सततच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे आता नवी मुंबई महानगरपालिकेने लॉकडाऊनमध्ये वाढ केली आहे.  मंगळवारी सापडलेल्या रुग्णांमध्ये बेलापूर २८, नेरुळ ३४, वाशी २०, तुर्भे १४, कोपरखैरणे ३७, घणसोली ३८, ऐरोली ५८, दिघामधील १० रुग्णांचा समावेश आहे.

समाधानाची बाब म्हणजे एका दिवसात २६८ जणांनी कोरोनावर मात केली आहे.  बेलापूर २५, नेरुळ ५०, वाशी ३९, तुर्भे ११, कोपरखैरणे १२, घणसोली ७२, ऐरोली ५६, दिघामधील ३ रुग्ण बरे होऊन घरी गेले. एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या ६०७२ वर पोहोचली आहे.  नवी मुंबईत सध्या ३५३५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.हेही वाचा -

‘धारावी पॅटर्न’ मध्ये पोलिसांची कामगिरी ही खरीच कौतुकास्पद – अनिल देशमुख

गूड न्यूज! कोरोना रुग्णाच्या वाढीत घसरण, रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात ७० टक्क्यांपर्यंत वाढ
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा