नवी मुंबईत शुक्रवारी कोरोनाचे नवीन २४० रुग्ण सापडले आहेत. तर ८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्णांची संख्या आता १० हजार ७८६ झाली आहे.
कोरोनामुळे नवी मुंबईतील ३३० नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. नवी मुंबईत गेल्या ७ दिवसांमध्ये २०२८ रुग्ण सापडले आहेत. गुरूवारी नवी मुंबईमध्ये आढळलेल्या रुग्णांमध्ये बेलापूर २६, नेरुळ ४१, वाशी २६, तुर्भे ३२, कोपरखैरणे ४३, घणसोली ३५, ऐरोली ३१, दिघा येथील ६ रुग्णांचा समावेश आहे.
२१२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. शुक्रवारी बेलापूर १९, नेरुळ १५, वाशी ६, तुर्भे ११, कोपरखैरणे ३२, घणसोली ५९, ऐरोली ६३, दिघातील ७ रुग्ण बरे होऊन घरी गेले. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६७३२ वर पोहोचली आहे. नवी मुंबईत सध्या ३७२४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
हेही वाचा -
अखेर डहाणू ते चर्चगेट लोकल रुळावर, अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना दिलासा
महापालिकेनं अखेर नाल्यावरील 'तो' फलक हटवला