Advertisement

मुंबईत लवकरच आणखी २५ लसीकरण केंद्र

मुंबईत येत्या आठवड्यात लसीकरण केंद्रांची क्षमता वाढविण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला आहे.

मुंबईत लवकरच आणखी २५ लसीकरण केंद्र
SHARES

कोरोनाच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी राज्य देशभरात लसीकरण करण्यात आलं. मागील अनेक दिवसांपासून हजारो लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. तसंच, आता मुंबईत येत्या आठवड्यात लसीकरण केंद्रांची क्षमता वाढविण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला आहे. सध्या ६५ लसीकरण केंद्र कार्यरत आहेत. येत्या आठवड्यात आणखी २५ लसीकरण केंद्र वाढविण्यात येणार असून दिवसाला ९,५०० आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याचं उद्दिष्ट आहे.

'महापालिकेच्या केईएम, सायन, नायर आणि कूपरमध्ये आता ५ ऐवजी १० लसीकरण केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे. तर वांद्रे येथील जम्बो कोविड केंद्रात १५ लसीकरण केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. सर्व केंद्रांवर १००हून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. अंधेरी येथील सेव्हन हिल्स रुग्णालय, गोरेगावमधील नेस्को आणि दहिसरमधील जंबो कोविड केअर सेंटर पुढील लसीकरण केंद्रे असू शकतात', अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

कोविन ॲपवरून लाभार्थ्यांना रविवारी लसीकरणासाठी संदेश जाणार आहे. संदेश न गेल्यास महापालिकेच्या विभाग कार्यालयातून उपस्थितीसाठी संपर्कही साधण्यात येईल. वाॅक इन व्हॅक्सिन सुरू केल्यापासून लसीकरणासाठी प्रतिसाद वाढत आहे. लसीबाबत गैरसमज, अफवा दूर करण्यासाठी शासकीय पातळीवर लवकरच जनजागृती मोहीम हाती घेण्यात येणार आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा