Advertisement

नवी मुंबईत मंगळवारी कोरोनाचे नवीन २६५ रुग्ण

नवी मुंबईत मंगळवारी (८ सप्टेंबर) कोरोनाचे नवीन २६५ रुग्ण सापडले आहेत. तर २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

नवी मुंबईत मंगळवारी कोरोनाचे नवीन २६५ रुग्ण
SHARES

नवी मुंबईत मंगळवारी (८ सप्टेंबर) कोरोनाचे नवीन २६५ रुग्ण सापडले आहेत. तर २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्णांची संख्या आता २८,८१० झाली आहे.

मंगळवारी बेलापूर ४९, नेरुळ ४०, वाशी ५६, तुर्भे २४, कोपरखैरणे ३६, घणसोली २८, ऐरोली २७, दिघामध्ये ५ नवे रुग्ण आढळले आहेत. दिवसभरात ४०२ जणांनी कोरोनावर मात केली आहे.  बेलापूर ५०, नेरुळ ७८, वाशी २८, तुर्भे ३७, कोपरखैरणे ६०,  घणसोली ४८, ऐरोली ९५ आणि दिघामधील ६ रुग्ण बरे झाले आहेत.  बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २४७५६ झाली आहे. तर मृतांचा आकडा ६३५ झाला आहे.

नवी मुंबईत सध्या ३४१९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर कोरोनामुक्तीचा दर ८६ टक्के झाला आहे. नवी मुंबईत ४ हजार ३५८ खाटांची संख्या आता ५ हजार ३५८ वर पोहोचली आहे. वाशी येथील निर्यात भवन महिला रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. तुर्भे येथील राधास्वामी सत्संग भवन येथेही १ हजार प्राणवायूयुक्त खाटांची निर्मिती करण्यात आली आहे. तर आणखी तेराशे खाटांचे नियोजन करण्यात आले आहे.



हेही वाचा -

इमारतींमध्ये राबवली जाणार 'चेस द व्हायरस' मोहीम

महापालिका पुन्हा घेणार कोरोनाग्रस्तांचा शोध


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा