Advertisement

कल्याण डोंबिवलीत नवीन २७७ कोरोना रुग्ण

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात शनिवारी कोरोनाचे नवीन २७७ रुग्ण आढळले. तर ६ जणांचा मृत्यू झाला.

कल्याण डोंबिवलीत नवीन २७७ कोरोना रुग्ण
SHARES

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात शनिवारी कोरोनाचे नवीन २७७ रुग्ण आढळले.  तर ६ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ४५९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ४३,३९२ झाली आहे. यामध्ये ३६७१ रुग्ण उपचार घेत असून ३८,८७७ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ८४४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नवीन रूग्णांमध्ये कल्याण पूर्व ४४, कल्याण प १०७, डोंबिवली पूर्व ८१, डोंबिवली प ३८, मांडा टिटवाळा १, तर मोहना येथील ६ रुग्णांचा समावेश आहे.

डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ९९ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, १२ रुग्ण हे वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून, ८ रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय, ४ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून, ३ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड सेंटर येथून, २ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून, २ रुग्ण आसरा फाउंडेशन स्कूलमधून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशनमधून बरे झालेले आहेत.



हेही वाचा-

एसटी कर्मचाऱ्यांचा एक महिन्याच्या पगार येत्या गुरुवारपर्यंत होणार

तर फडणवीसांनी खुशाल राज्य सोडून जावं, अनिल परब संतापले



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा