Advertisement

अरे बापरे! राज्यात दिवसभरात 99 जणांच्या मृत्यूची नोंद, तर 2940 नवे रुग्ण

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 4 लाख 33 हजार 557 नमुन्यांपैकी 65 हजार 168 जण पॉझिटिव्ह आले आहेत.

अरे बापरे! राज्यात दिवसभरात 99 जणांच्या मृत्यूची नोंद, तर 2940 नवे रुग्ण
SHARES

राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या 65 हजार 168 झाली आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसून आला. आज दिवसभरात 2940 नवे रुग्ण आढळून आले असून दिवसभरात 99 मृत्यूंची नोंद झालेली आहे. आतापर्यंत राज्यभरात 28 हजार 081 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या 34 हजार 881 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले. 

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 4 लाख 33 हजार 557 नमुन्यांपैकी 65 हजार 168 जण पॉझिटिव्ह आले आहेत. तर सध्या राज्यात 5 लाख 51 हजार 660 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 34 हजार 420 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात 99 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली असून यात मागील दोन दिवसांच्या मृत्यूची नोंद असल्याचे सांगितले जात आहे.आज एकूण संख्या 2197  झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी 62 पुरुष तर 37 महिला आहेत. आज नोंद झालेल्या 99 मृत्यूपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 48  रुग्ण आहेत तर 49  रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर 2 जण 40 वर्षांखालील आहे. या 99 रुग्णांपैकी 66 जणांमध्ये ( 66 %)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड 19 मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 2197 झाली आहे. आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी 40 मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित  मृत्यू हे 6 मे ते 27 मे या कालावधीतील आहेत. या कालावधीतील 59 मृत्यूंपैकी मुंबई 35, पनवेल 7, ठाणे आणि वसई-विरार 6, नवी मुंबई 2, कल्याण-डोंबिवली 1, जळगाव 1 मृत्यूंची नोंद आहे.

(टीप- आय सी एम आर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील  दिनांक 7 मे 2020 पासूनच्या 311 रुग्णांचा आणि ठाणे जिल्ह्यातील 140 रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही. ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर. पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड19 बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 2345 कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण 16 हजार 414 सर्वेक्षण पथकांनी  काम केले असून त्यांनी 65.91  लाख  लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.  

मागील पाच दिवसांत 502 मृत्यूंची नोंद

26 मे रोजी 97 मृत्यूची नोंद

27 मे रोजी 105 मृत्यूंची नोंद

28 मे रोजी 85 मृत्यूची नोंद

29 मे रोजी 116 मृत्यूंची नोंद

30 मे रोजी 99 मृत्यूंची नोंद 




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा