Advertisement

कोरोनामुळं मानसिक समस्यांमध्ये वाढ

यंदा जीवघेण्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. या लॉकडाऊनमुळं सामान्यांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर परिणाम झाला आहे.

कोरोनामुळं मानसिक समस्यांमध्ये वाढ
SHARES

यंदा जीवघेण्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. या लॉकडाऊनमुळं सामान्यांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर परिणाम झाला आहे. सतत कामात व्यस्त असणाऱ्या समान्यांना एकाच ठिकाणी इतका काळ राहण्याची सवय नसल्यानं त्यांना या मानसिक त्रासाला समोरं जावं लागत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या काळात मानसिक आरोग्याच्या तक्रारींविषयी मार्गदर्शन घेण्याचं प्रमाण ३०० टक्क्यांनी वाढलं आहे. तसंच, यामध्ये महिलांचं प्रमाण ३३ टक्के आहे.

महिला-पुरुषांचं टेलिमेडिसीन वापराचं प्रमाण ७५-२५ होतं, यंदा ते ६८-३२ टक्क्यांवर पोहोचलं आहे. राष्ट्रीय स्तरावर विचार केल्यास चेन्नईत टेलिमेडिसीनचा वापर सर्वाधिक व्यक्तींनी केला. त्यानंतर बंगळुरू, दिल्ली, मुंबई, पुणे, हैदराबाद, कोलकाता या शहरांतील टेलिमेडिसीनचं प्रमाण मागच्या वर्षाच्या तुलनेत ३०० टक्क्यांनी वाढलेलं दिसून आलं.

न्यूरोसर्जन, हृदयविकारतज्ज्ञ, ऑन्कोलॉजिस्ट अशा तज्ज्ञांकडील शारीरिक तक्रारींविषयीचा ओघ ३२ टक्क्यांनी कमी झाल्याचं निरीक्षण आहे. ५० वर्षांहून अधिक वयोगटातील व्यक्तींनीही टेलिमेडिसीनला पसंती दर्शविली आहे. टेलिमेडिसीनच्या एकूण प्रमाणात हे प्रमाण १२ टक्के एवढे आहे. गेल्या वर्षी हे प्रमाण ५ टक्के होते.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा