Advertisement

डेल्टा वेरिएंटचा वाढता धोका, जिनोम सिक्वेंसिंगमधून सापडले 'इतके' रुग्ण

मुंबई महानगरपालिकेने जिनोम सिक्वेंसिंगच्या दुसऱ्या सत्राचे परिणाम गुरुवारी जाहीर केले.

डेल्टा वेरिएंटचा वाढता धोका, जिनोम सिक्वेंसिंगमधून सापडले 'इतके' रुग्ण
SHARES

मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात जिनोम सिक्वेंसिंगमध्ये ३०४ जणांना डेल्टा वेरिएंटची बाधा झाली असल्याचे समोर आले. एकूण ३७६ जणांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. डेल्टा प्लसची लागण झालेला एकही रुग्ण आढळला नसल्याची माहिती देण्यात आली. मुंबई महानगरपालिकेने जिनोम सिक्वेंसिंगच्या दुसऱ्या सत्राचे परिणाम गुरुवारी जाहीर केले. 

डेल्टा वेरिएंट ला B.1.617.2  असेही म्हटले जाते. मागील वर्षीच्या अखेरीस डेल्टा वेरिएंट पहिल्यांदा भारतात आढळला होता. डेल्टा वेरिएंटमुळे करोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाली होती. तर, डेल्टा प्लस वेरिएंट हा देखील वेगाने फैलावणारा वेरिएंट आहे. जून महिन्यात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने variant of concern असे जाहीर केले होते. 

मुंबई महानगरपालिकेच्या दुसऱ्या चक्राच्या परिणामानुसार, दोन नमुने '१९ए' आणि चार नमुने '२०ए'  या उपप्रकारासाठी तपासण्यात आले. तर, उर्वरित नमुने हे सामान्य करोना विषाणूसाठी तपासण्यात आले. 

जिनोम सिक्वेंसिंगच्या पहिल्या चक्राचे निकाल ऑगस्टमध्ये जाहीर करण्यात आले होते. त्यावेळी १८८ नमुन्यांपैकी एकाही जणाला डेल्टा प्लस वेरिएंटची बाधा झाली नसल्याचे समोर आले. मात्र, १२८ नमुन्यांमध्ये डेल्टा वेरिएंट आढळला होता.संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा