Advertisement

कोरोनाचा उद्रेक, मुंबईत शुक्रवारी ३ हजार ६२ नवे कोरोना रुग्ण

मुंबईत कोरोनातून बरे होण्याचा दर ९१ टक्क्यांवर घसरला आहे. तर रुग्ण दुपटीचं प्रमाण १२४ दिवसांवर घसरले आहे.

कोरोनाचा उद्रेक, मुंबईत शुक्रवारी ३ हजार ६२ नवे कोरोना रुग्ण
SHARES

मुंबईत कोरोनाचा उद्रेक झाला आहे. मुंबईत आतापर्यंतची सर्वाधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. शुक्रवारी मुंबईत तब्बल ३ हजार ६२ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर १० जणांचा मृत्यू झाला आहे.

शुक्रवारी १ हजार ३३४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मुंबईतील कोरोना रुग्णांचा एकूण आकडा ३ लाख ५५ हजार ८९७ झाला आहे. यापैकी ३ लाख २३ हजार २८१ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या २० हजार १४० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

मुंबईत कोरोनातून बरे होण्याचा दर ९१ टक्क्यांवर घसरला आहे. तर रुग्ण दुपटीचं प्रमाण १२४ दिवसांवर घसरले आहे. मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या रोजच वाढल्याने मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. येत्या काळात मुंबई पालिका आणखी कठोर पावलं उचलणार का याकडे मुंबईकरांचे लक्ष लागून राहिलं आहे.

दरम्यान, कोरोनाचा हा फैलाव रोखण्यासाठी मुंबई महापालिका मुंबईत मिशन टेस्टिंग राबवणार आहे. यामध्ये मुंबईत दिवसाला ५० हजार कोरोना चाचण्या करण्याचं लक्ष्य पालिका प्रशासनाने ठेवलं आहे. सध्या मुंबईत २० ते २३ हजार चाचण्या रोज होत आहेत.



हेही वाचा- 

१३४ खासगी रुग्णालयांना लसीकरणासाठी मान्यता

महाराष्ट्रात कोविड लसीचे दररोज ३ लाख डोस द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा