Advertisement

कल्याण डोंबिवलीत ३०९ नवीन रुग्ण, ५ जणांचा मृत्यू

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात शुक्रवारी कोरोनाचे ३०९ नवीन रुग्ण आढळले. तर ५ जणांचा मृत्यू झाला.

कल्याण डोंबिवलीत ३०९ नवीन रुग्ण, ५ जणांचा मृत्यू
SHARES

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात शुक्रवारी कोरोनाचे ३०९ नवीन रुग्ण आढळले. तर ५ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत २९६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या आता ४३,११५ झाली आहे. यामध्ये ३८५९ रुग्ण उपचार घेत असून ३८,४१८ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ८३८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नवीन रूग्णांमध्ये कल्याण पूर्व ५९, कल्याण प  ११८, डोंबिवली पूर्व ८५, डोंबिवली प ३१, मांडा टिटवाळा ९, तर मोहना येथील ७ रुग्णांचा समावेश आहे.

डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ७९ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, १२ रुग्ण हे वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून, ८ रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय,  २ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून,  ३ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड सेंटर येथून, ८ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून, २ रुग्ण आसरा फाउंडेशन स्कूलमधून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशनमधून बरे झालेले आहेत.



हेही वाचा -

डॉक्टरांना कामाचे दिवस जास्त आणि क्वारंटाईनसाठी फक्त एक दिवस

अंधेरीतील 'त्या' इमारतीत २२ जणांना कोरोनाचा संसर्ग



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा