नवी मुंबईत रविवारी (२३ आॅगस्ट) कोरोनाचे नवीन ३१६ रुग्ण सापडले आहेत. तर ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्णांची संख्या आता २३,३२१ झाली आहे.
रविवारी बेलापूर ५३, नेरुळ ७५, वाशी ४१, तुर्भे ३३, कोपरखैरणे ३९, घणसोली ३६, ऐरोली ३६ आणि दिघामध्ये ३ नवे रुग्ण आढळले आहेत. दिवसभरात ३७५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. बेलापूर ६९, नेरुळ ५३, वाशी २२, तुर्भे ६०, कोपरखैरणे ५९, घणसोली ४९, ऐरोली ५४ आणि दिघामधील ९ रुग्ण बरे झाले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १९३३० पोहोचली आहे. तर मृतांचा आकडा ५४२ झाला आहे.
नवी मुंबईत सध्या ३४४९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. नवी मुंबईत आतापर्यंत ७ हजार ९८० प्रतिजन चाचण्या करण्यात आल्या आहेत. येथे एका दिवसाला अडीच हजारपेक्षा अधिक चाचण्या होत आहेत. तर कोरोनामुक्तीचा दर ८३ टक्के झाला आहे.
हेही वाचा-
Ganpati festival 2020 Live: घरातूनच घ्या बाप्पाचं ऑनलाईन दर्शन
गणेशोत्सव काळात गर्दी होता कामा नये- मुख्यमंत्री