Advertisement

पनवेल महापालिका हद्दीत बुधवारी ३३ नवीन कोरोना रुग्ण

पनवेल महापालिका हद्दीत बुधवारी (१३ जानेवारी) ३३ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून ५९ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

पनवेल महापालिका हद्दीत बुधवारी ३३ नवीन कोरोना रुग्ण
SHARES

पनवेल महापालिका हद्दीत बुधवारी (१३ जानेवारी) ३३ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून ५९ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तसेच पनवेलमधील एका मृत्यूची नोंद झाली आहे.

पनवेल महापालिका हद्दीतील आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये पनवेलमधील ७,   नवीन पनवेल ३, खांदा काॅलनी २, कळंबोली १, कामोठे ३, खारघर १४, तळोजा येथील ३ रुग्णांचा समावेश आहे. 

बरे झालेल्या रूग्णांमध्ये पनवेलमधील पनवेल १२, नवीन पनवेल १०,  कळंबोली ८, कामोठे ८, खारघर येथील २१ येथील  रुग्णांचा समावेश आहे. 

 आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण २८१०१ कोरोना रूग्णांपैकी २७१०३ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून ६१८ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे ३८० ॲक्टीव्ह रूग्ण आहेत.



हेही वाचा -

सीरम लसीचा साठा वेगवेगळ्या शहरांमध्ये रवाना, महाराष्ट्राला मिळाले ९ लाख ६३ हजार कोरोना डोसेस

दिलासादायक! मुंबई-मडगाव एक्स्प्रेस ३१ मार्चपर्यंत



Read this story in English
संबंधित विषय