Advertisement

कल्याण डोंबिवलीमध्ये ३३० नवे कोरोना रुग्ण

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात गुरूवारी कोरोनाचे ३३० नवीन रुग्ण आढळले. तर ९ जणांचा मृत्यू झाला आहे.

कल्याण डोंबिवलीमध्ये ३३० नवे कोरोना रुग्ण
SHARES

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात गुरूवारी कोरोनाचे ३३० नवीन रुग्ण आढळले. तर ९ जणांचा मृत्यू झाला आहे. ३०९ जणांना गेल्या २४ तासांत डिस्चार्ज देण्यात आला आहे.


पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या आता २३,५४७ झाली आहे. यामध्ये ४२०२ रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत १८,८७० रूग्ण बरे झाले आहेत. तर ४७५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

नवीन ३३० रूग्णांमध्ये कल्याण पूर्व ७६,  कल्याण प. ९७, डोंबिवली पूर्व ८९, डोंबिवली प २५, मांडा टिटवाळा २९, मोहना ९  तर पिसवली येथील ५ रुग्णांचा समावेश आहे. डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ९६ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, १६ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकुलामधून, ८ रुग्ण बाज आर. आर. रूग्णालयामधून,  १२ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून, ६ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशनमधून बरे झालेले आहेत.



हेही वाचा -

'या' भागांमध्ये सेरो सर्वेक्षणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात

मुंबईत १ लाख रुग्णांनी केली कोरोनावर मात, ११३२ नवे रुग्ण




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा