Advertisement

दिलासा! कन्टेंटमेंट झोनमधून 331 ठिकाणं वगळली

ज्या भागात कोरोनाचे रुग्ण आढळले ते भाग मुंबई महापालिकेने कन्टेंटमेंट झोन म्हणून जाहीर केले आहेत. मुंबईत आतापर्यंत १,४५९ ठिकाणं प्रतिबंधित करण्यात आली आहेत.

दिलासा! कन्टेंटमेंट झोनमधून 331 ठिकाणं वगळली
SHARES

मागील 14 दिवसांंमध्ये एकही नवा रुग्ण न आढळल्याने मुंबईतील कन्टेंटमेंट झोन (प्रतिबंधित क्षेत्र) मधून 331 ठिकाणं वगळली वगळण्यात आली आहेत. येथील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी घराबाहेर पडता येणार आहे.

ज्या भागात कोरोनाचे रुग्ण आढळले ते भाग मुंबई महापालिकेने कन्टेंटमेंट झोन म्हणून जाहीर केले आहेत. मुंबईत आतापर्यंत १,४५९ ठिकाणं प्रतिबंधित करण्यात आली आहेत. या भागामध्ये अनेक निर्बंध लागू केले जातात. घरोघरी करण्यात येत असलेली तपासणी, वेळीच होत असलेले उपचार, संसर्ग टाळण्यासाठी केलेल्या उपाययोजना आदी विविध कारणांमुळे आता कन्टेंटमेंट झोनची संख्या घटली आहे.  

कन्टेंटमेंट झोनमधील नागरिकांना हे ठिकाण सोडून बाहेर जाता येत नाही. तसंच बाहेरील व्यक्तीला या ठिकाणी प्रवेश नाकारण्यात येतो. येथील रहिवाशांना पालिकेकडून धान्य वा जेवणाचा पुरवठा करण्यात येतो. याशिवाय रुग्णाच्या संपर्कातील संबंधितांची कोरोना चाचणीही करण्यात येते. मागील १४ दिवसांमध्ये यापैकी ३३१  कन्टेंटमेंट झोनमध्ये एकही कोरोनाचा रुग्ण आढळला नाही.  त्यामुळे ही ३३१ ठिकाणं वगळण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. 



हेही वाचा -

राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 10 हजार 498 वर

‘याच’ अटींवर सोडता येईल महाराष्ट्र, परप्रांतीयांसाठी दिशानिर्देश जारी




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा