राज्यात सोमवारी कोरोनाचे नवीन ३३६५ रुग्ण आढळले. तर ३१०५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. २३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रविवारी ४० रुग्णांचा मृत्यू झाला होता.
राज्यातील मृत्यूदर २.४९ टक्के इतका आहे. राज्यात आजपर्यंत १९ लाख ७८ हजार ७०८ कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.७ टक्के झालं आहे. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ५३ लाख ५९ हजार ०२६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २० लाख ६७ हजार ६४३ नमुने पॉझिटिव्ह निघाले आहेत. हे प्रमाण १३.४६ टक्के इतके आहे. सध्या राज्यात १ लाख ७४ हजार ७०४ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत, तर १ हजार ७१४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
दरम्यान, कोरोना पार्श्वभूमीवर कुणीही मास्क घालत नाही हे अत्यंत घातक आहे. याची आपल्याला मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे. राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावाची मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. कोरोनावर कोणीही राजकारण करू नये, असंही ते म्हणाले. रुग्ण वाढत असल्यानं कोरोनासंदर्भात कडक निर्बंध पुन्हा एकदा लागू करण्यात येण्याचे संकेत अजित पवार यांनी दिले आहेत.
मुंबईतील नेहरूनगर, टिळकनगरमध्ये वेगाने कोरोना रुग्णवाढ
नागरिकांच्या सुरक्षेसाठी धारावीत पुन्हा चाचण्यांत वाढ