Advertisement

राज्यात बुधवारी नवे ३४ हजार रुग्ण

राज्यात एकूण रुग्णांचा आकडा ५४ लाख ६७ हजार ५३७ झाला आहे. तर आतापर्यंत ४९ लाख ७८ हजार ९३७ रुग्ण बरे झाले आहेत.

राज्यात बुधवारी नवे ३४ हजार रुग्ण
SHARES

राज्यात बुधवारी ३४ हजार ३१ नवे रुग्ण सापडले. तर ५१ हजार ४५७ रुग्णांना घरी सोडण्यात आलं आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील रुग्णसंख्या घटत असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. 

मुंबईत १३५० नवीन रुग्ण आढळले. तर ४५६५ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत    ६४६१६३ रुग्ण बरे झाले आहेत.  मुंबईत सध्या २९६४३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बरे झालेल्या रुग्णांचा दर ९३ टक्के आहे. तर रुग्ण दुप्पटीचा कालावधी २६९ दिवस झाला आहे. 

राज्यात एकूण रुग्णांचा आकडा ५४  लाख ६७ हजार ५३७ झाला आहे. तर आतापर्यंत ४९ लाख ७८ हजार ९३७ रुग्ण बरे झाले आहेत. बुधवारी ५९४ रुग्णांचा मृत्यू झाला. एकूण मृतांचा आकडा ८४ हजार ३७१ वर गेला आहे. सध्या राज्यात ४ लाख १ हजार ६९५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.०६ % एवढे झाले आहे. आतापर्यंत ३,१८,७४,३६४  चाचण्या झाल्या असून ५४,६७,५३७ (१७.१५टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३०,५९,०९५व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये तर २३,८२८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.



हेही वाचा - 

मुंबईच्या पालकमंत्र्यांनी केली नुकसानग्रस्त किनारपट्टीची पाहणी

चक्रीवादळानंतरही मुंबईत पावसाच्या हलक्या सरी

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा