Advertisement

नवी मुंबईत गुरूवारी कोरोनाचे नवीन ३४८ रुग्ण

नवी मुंबईत गुरूवारी (१५ ऑक्टोबर) कोरोनाचे नवीन ३४८ रुग्ण सापडले आहेत. तर ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

नवी मुंबईत गुरूवारी कोरोनाचे नवीन ३४८ रुग्ण
SHARES

नवी मुंबईत गुरूवारी (१५ ऑक्टोबर) कोरोनाचे नवीन ३४८ रुग्ण सापडले आहेत. तर ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्णांची संख्या आता ४१,३८३ झाली आहे.

गुरूवारी बेलापूर ६०, नेरुळ ८७, वाशी २१, तुर्भे २४, कोपरखैरणे ५५, घणसोली ४३, ऐरोलीमध्ये ५८  नवे रुग्ण आढळले आहेत. दिवसभरात ३४८ जणांनी कोरोनावर मात केली आहे.  बेलापूर ३९, नेरुळ ५६, वाशी ३४, तुर्भे ५८, कोपरखैरणे ६२,  घणसोली ४०, ऐरोली ५६, दिघामधील ३ रुग्ण बरे झाले आहेत.  

बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३७,५३३ झाली आहे. तर मृतांचा आकडा ८३६ झाला आहे. नवी मुंबईत सध्या ३०१४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर कोरोनामुक्तीचा दर ९० टक्के झाला आहे. 

शहरात खासगी रुग्णालयातील करोना रुग्णांच्या देयकांच्या तक्रारी मोठय़ा प्रमाणावर वाढल्या आहेत. यासाठी पालिकेने पालिका मुख्यालयातील तळमजल्यावर विशेष तक्रार निवारण कक्ष स्थापन केला आहे. संपर्कासाठी ०२२२/ ७५६७३८९  किंवा ७२०८४९००१० या व्हॉटसअॅप क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.



हेही वाचा- 

पुढील ३ महिने वृत्तवाहिन्यांच्या टीआरपीला स्थगिती, ‘बार्क’चा मोठा निर्णय

बाॅलिवूडला संपवण्याचे प्रकार सहन करणार नाही- उद्धव ठाकरे  



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा