Advertisement

पनवेल महापालिका हद्दीत सोमवारी ३५ नवीन कोरोना रुग्ण

पनवेल महापालिका हद्दीत सोमवारी (९ नोव्हेंबर) ३५ नवीन कोरोनारुग्ण आढळले असून १०४ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

पनवेल महापालिका हद्दीत सोमवारी ३५ नवीन कोरोना रुग्ण
SHARES

पनवेल महापालिका हद्दीत सोमवारी (९ नोव्हेंबर) ३५ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून १०४ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तर २ मृत्यूंची नोंद झाली असून पनवेल आणि कामोठे येथील प्रत्येकी एका रूग्णाचा समावेश आहे. 

पनवेल महापालिका हद्दीतील आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये पनवेलमधील ४, नवीन पनवेल ३, खांदा काॅलनी १, कळंबोली २, कामोठे १३, खारघर १०, तळोजा येथील २ रुग्णांचा समावेश आहे. 

बरे झालेल्या रूग्णांमध्ये पनवेलमधील पनवेल ५, नवीन पनवेल १९, कळंबोली ९, कामोठे २५, खारघर येथील ४६ रुग्णांचा समावेश आहे. 

आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण २४०६० कोरोनाबाधित रूग्णांपैकी २३०२२ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून ५६३ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे ४७५ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत.हेही वाचा-

अर्णब गोस्वामींना जामीन नाहीच, उच्च न्यायालयाने फेटाळला अर्ज

महानगरपालिका क्षेत्रात फटाके फोडणं किंवा आतषबाजी करण्यावर बंदी

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
POLL

आजच्या पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्स किती धावांचा डोंगर रचेल, असे वाटते ?
Submitting, please wait ...
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा