Advertisement

नवी मुंबईत बुधवारी कोरोनाचे नवीन ३७५ रुग्ण

नवी मुंबईत बुधवारी (१६ सप्टेंबर) कोरोनाचे नवीन ३७५ रुग्ण सापडले आहेत. तर ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

नवी मुंबईत बुधवारी कोरोनाचे नवीन ३७५ रुग्ण
SHARES

नवी मुंबईत बुधवारी (१६ सप्टेंबर) कोरोनाचे नवीन ३७५ रुग्ण सापडले आहेत. तर ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्णांची संख्या आता ३१,६९१ झाली आहे.

बुधवारी बेलापूर ६०, नेरुळ ७६, वाशी ३९, तुर्भे ३६, कोपरखैरणे ४७, घणसोली ५५, ऐरोली ५७, दिघामध्ये ५ नवे रुग्ण आढळले आहेत. दिवसभरात २९१ जणांनी कोरोनावर मात केली आहे.  बेलापूर ४८, नेरुळ ४४, वाशी ३५, तुर्भे ५०, कोपरखैरणे ३१,  घणसोली ५०, ऐरोली मधील ३३ बरे झाले आहेत.  बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २७४७३ झाली आहे. तर मृतांचा आकडा ६७५ झाला आहे.

नवी मुंबईत सध्या ३५४३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर कोरोनामुक्तीचा दर ८७ टक्के झाला आहे. शहरात खासगी रुग्णालयातील करोना रुग्णांच्या देयकांच्या तक्रारी मोठय़ा प्रमाणावर वाढल्या आहेत. यासाठी पालिकेने पालिका मुख्यालयातील तळमजल्यावर विशेष तक्रार निवारण कक्ष स्थापन केला आहे. संपर्कासाठी ०२२२/ ७५६७३८९  किंवा ७२०८४९००१० या व्हॉटसअँप क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.



हेही वाचा -

२ पेक्षा अधिक मजल्यांवर कोरोना रुग्ण आढळल्यास इमारत सील

मुंबईच्या 'या' परिसरात कोरोनामुळं सर्वाधिक मृत्यू



Read this story in हिंदी
संबंधित विषय