Advertisement

चिंता वाढली, राज्यात बुधवारी कोरोनाचे ३९ हजार ५४४ नवे रुग्ण

राज्यात कोरोना रुग्णांची वाढ चिंताजनक बनली आहे. बुधवारी राज्यात कोरोनाचे तब्बल ३९ हजार ५४४ नवीन रुग्ण आढळले.

चिंता वाढली, राज्यात बुधवारी कोरोनाचे ३९ हजार ५४४ नवे रुग्ण
SHARES

राज्यात कोरोना रुग्णांची वाढ चिंताजनक बनली आहे. बुधवारी राज्यात कोरोनाचे  तब्बल ३९ हजार ५४४ नवीन रुग्ण आढळले.  तर २७७ जणांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात बुधवारी २३ हजार ६०० रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.  नव्या रुग्णसंख्येमुळे एकूण रुग्णांचा आकडा २८ लाख १२ हजार ९८० वर पोहोचला आहे. यापैकी २४ लाख ७२७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर ५४ हजार ६४९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ३ लाख ५६ हजार २४३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यातील रिकव्हरी रेट ८५. ३४ टक्के इतका झाला आहे.  सध्या राज्यात १७,२९,८१६ व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत तर १७,८६३ व्यक्ती संस्थातमक क्वारांटाईनमध्ये आहेत.

मुंबईत बुधवारी ५ हजार ३९४ रुग्ण आढळले. तर ३ हजार १३० रुग्ण बरे झाले.  मुंबईत १५ मृतांची नोंद झाली आहे. नव्या रुग्णसंख्येमुळे एकूण रुग्णांचा आकडा ४ लाख १४ हजार ७१४व र पोहोचला आहे. तर यापैकी ३ लाख ५० हजार ६६० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर ११ हजार ६८६ रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत. तर, सध्या ५१ हजार ४११ रुग्णांवर मुंबईत उपचार सुरू आहेत.

ठाण्यात तब्बल ९९५ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात ८५५ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.६४७ रुग्णांना घरी सोडण्यात आले. तर तिघांचा मृत्यू झाला आहे.सध्या कल्याण-डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात ८ हजार ६३२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा -

  1. एफआयआर कुठंय? परमबीर सिंह यांना हायकोर्टाने फटकारलं

  1. कोरोना रुग्णासाठी बेड पाहिजे?, 'या' नंबरवर त्वरीत संपर्क साधा
Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा