Advertisement

सिटी स्कॅनचे दर निश्चित करण्यासाठी समितीची स्थापना

याप्रकरणी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ट्विटरद्वारे माहिती दिली आहे.

सिटी स्कॅनचे दर निश्चित करण्यासाठी समितीची स्थापना
SHARES

डॉक्टर कोरोनाच्या चाचणीबरोबर (HRCT) फुफ्फुसांचा सिटीस्कॅन संशयित कोरोना रुग्णांना करायला सांगतात. सिटीस्कॅनवरून वैद्यकीय तज्ज्ञांना रुग्णाला कोरोना आहे की नाही किंवा फुफ्फुसला किती इजा झाली आहे हे निदान करुन उपचार देणं सोपं होतं.

मात्र खासगी रुग्णालयात, तपासणी केंद्रात सिटीस्कॅनचे दर हे सर्वसामान्यांना परवडणारे नाहीत. याकरिता सिटीस्कॅनचे दर निश्चित करण्याकररीता समिती गठित करण्यात आली आहे.

याप्रकरणी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. याबाबत माहिती देताना ते म्हणाले की, "कोविड-19 च्या निदानासाठी सिटीस्कॅन (HRCT) चाचणी अत्यंत महत्त्वाची आहे. खाजगी रुग्णालयामार्फत यासाठी १० हजारांपेक्षा जास्त दर आकारण्यात येत असल्याचं निदर्शनास आलं आहे, तशा तक्रारी शासनास प्राप्त झाल्या आहेत. सामान्य नागरिकांना दिलासा मिळावा आणि परवडणाऱ्या दरात सिटीस्कॅन (HRCT) चाचणी खासगी रुग्णालयात मिळावी यासाठी सिटीस्कॅनचे कमाल दर निश्चित करण्यासंदर्भात समिती गठित करण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे."

यापूर्वी शासनाने अशीच समिती स्थापन करून कोरोनाच्या (आरटी-पीसीआर) चाचणीचे खासगी प्रयोगशाळेतील दर निश्चित केले होते. यामुळे सर्वसामान्य रुग्णांना मोठा दिलासा मिळाला होता. त्याच पद्धतीनं सिटीस्कॅनच्या बाबतीत शासन धोरण घेत असल्याचं दिसत आहे.



हेही वाचा

कल्याण डोंबिवलीत ३९६ नवीन रुग्ण, ५ जणांचा मृत्यू

पालिकेच्या डोर टू डोर मोहिमेला सुरुवात

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा