Advertisement

भारतात ४० कोटी नागरिकांनी घेतली कोरोना लस

देशात १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू करण्यात आलं. सुरुवातीला आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली होती.

भारतात ४० कोटी नागरिकांनी घेतली कोरोना लस
SHARES

भारतात आतापर्यंत एकूण ४० कोटी लोकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. केंद्र सरकारकडून देण्यात आलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे.  

आकडेवारीनुसार, ४० कोटी ४४ लाख ६७ हजार ५२६ नागरिकांनी कोरोनावरील लस घेतली आहे. देशात १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू करण्यात आलं. सुरुवातीला आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली होती. आरोग्य कर्मचाऱ्यांपैकी पहिला डोस घेतलेल्यांची संख्या १ कोटी २ लाख ६८ हजार ८८२ इतकी आहे. तर ७५ लाख ३८ हजार ८७७ जणांना दोन्ही डोस घेतले आहेत. 

फ्रंट लाइन वर्कर्समध्ये १ कोटी ७७ लाख ९१ हजार ६३५ जणांनी पहिला डोस घेतला आहे. तर दुसरा डोस १ कोटी ३ लाख ४१ हजार ८४८ जणांनी घेतला आहे. लसीकरण मोहिम तीन वयोगटात टप्प्या टप्प्याने सुरु करण्यात आली होती. यामध्ये ६० वर्षांवरील नागरिकांमध्ये ७ कोटी २० लाख ६१ हजार ३२७ जणांनी पहिला डोस घेतला आहे. तर ३ कोटी ११ लाख ७५ हजार ९५२ जणांनी दोन्ही डोस घेतले आहेत. 

४५ वर्षांवरील ९ कोटी ७४ लाख १८ हजार ७८९ नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. तर दुसरा डोस २ कोटी ९० लाख १२ हजार २८९ जणांनी घेतला आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा