Advertisement

कल्याण डोंबिवलीत ४६३ नवीन कोरोना रुग्ण

कल्याण डोंबिवली (kalyan dombivali) महानगरपालिका क्षेत्रात बुधवारी कोरोनाचे नवीन ४६३ रुग्ण आढळले. तर ५ जणांचा मृत्यू झाला.

कल्याण डोंबिवलीत ४६३ नवीन कोरोना रुग्ण
SHARES

कल्याण डोंबिवली (kalyan dombivali) महानगरपालिका क्षेत्रात बुधवारी कोरोनाचे नवीन ४६३ रुग्ण आढळले. तर ५ जणांचा मृत्यू झाला. बुधवारी ५४४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. 

पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ३९,९३१ झाली आहे. यामध्ये ४७७३ रुग्ण उपचार घेत असून ३४,३७३ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ७८५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नवीन रूग्णांमध्ये कल्याण पूर्व ५७, कल्याण प १४१, डोंबिवली पूर्व १५१, डोंबिवली प १०२, मांडा टिटवाळा ९, मोहना येथील ३ रुग्णांचा समावेश आहे.

डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ७१ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, ६ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकुलमधून, ८ रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय, १४ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून, २ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड सेंटर येथून, ४ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशनमधून बरे झालेले आहेत.हेही वाचा

ऑक्सिजन मशीनच्या भाड्यात वाढ, ऑल फूड अँड ड्रग्ज असोसिएशनचा निषेध

लक्षणं नसलेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्याचे पालिकेचे निर्देश, 'हे' आहे कारणसंबंधित विषय