Advertisement

राज्यात ४ हजार ६५४ नवीन कोरोना रुग्ण

राज्यात आतापर्यंत ६२ लाख ५५ हजार ४५१ रुग्ण करोनातून बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७.०२ टक्के इतकं झालं आहे.

राज्यात ४ हजार ६५४ नवीन कोरोना रुग्ण
SHARES

राज्यात शुक्रवारी कोरोनाचे नवीन ४ हजार ६५४ रुग्ण आढळले. तर ३ हजार ३०१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसंच १७० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

राज्यात आतापर्यंत ६२ लाख ५५ हजार ४५१ रुग्ण करोनातून बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७.०२ टक्के इतकं झालं आहे.  सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के इतका आहे. राज्यात आता ५१ हजार ५७४ सक्रिय रुग्ण आहेत.

राज्यात १ ऑगस्ट रोजी राज्यात ७८,९६२ सक्रिय रुग्ण होते. १० ऑगस्ट रोजी ही संख्या कमी होऊन ६६,१२३ एवढी झाली तर २० ऑगस्टला ५५,४५४ असलेली ही सक्रिय रुग्णसंख्या आणखी कमी होऊन २५ ऑगस्ट रोजी ५०,१८३ एवढी खाली आली. ऑगस्टमध्ये राज्यातील एकूण सक्रिय रुग्णसंख्या घसरुन २८,७७९ एवढी कमी झाली आहे. आजघडीला देशात केरळमध्ये सर्वाधिक म्हणजे १,५९,८८७ एवढी रुग्णसंख्या आहे. तर देशात ३,२२,३२७ सक्रिय रुग्ण आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा