Advertisement

नवी मुंबईत गुरूवारी कोरोनाचे नवीन ४७७ रुग्ण

नवी मुंबईत गुरूवारी (२० आॅगस्ट) कोरोनाचे नवीन ४७७ रुग्ण सापडले आहेत. तर ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

नवी मुंबईत गुरूवारी कोरोनाचे नवीन ४७७ रुग्ण
SHARES

नवी मुंबईत गुरूवारी (२० आॅगस्ट) कोरोनाचे नवीन ४७७ रुग्ण सापडले आहेत. तर ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्णांची संख्या आता २२,२७५ झाली आहे.

 गुरूवारी  बेलापूर ६७, नेरुळ ८३, वाशी ४७, तुर्भे ६६, कोपरखैरणे ६२, घणसोली ७१, ऐरोली ६८ आणि दिघामध्ये १३ नवे रुग्ण आढळले आहेत. दिवसभरात ३०३  जणांनी कोरोनावर मात केली आहे.  बेलापूर ६९, नेरुळ ४६, वाशी २०, तुर्भे १९, कोपरखैरणे ३१, घणसोली ४३, ऐरोली ७० आणि दिघामधील ५ रुग्ण बरे झाले आहेत.  बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १८३०४ पोहोचली आहे. तर मृतांचा आकडा ५२५ झाला आहे.

नवी मुंबईत सध्या ३४४६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  नवी मुंबईत आतापर्यंत ७ हजार ९८० प्रतिजन चाचण्या करण्यात आल्या आहेत. येथे एका दिवसाला अडीच हजारपेक्षा अधिक चाचण्या होत आहेत. तर कोरोनामुक्तीचा दर ८२ टक्के झाला  आहे. 


हेही वाचा -

मुंबईतील अनेक रुग्णालयं होणार नॉनकोविड

मुंबईत ऑगस्टमध्ये मलेरियाचे ५९२ रुग्ण



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा