Advertisement

Coronavirus Updates : देशभरातून कोरोनाच्या ४८ रुग्णांना डिस्चार्ज

देशभरातून कोरोनाची बाधा झालेले ४८ रुग्ण उपचारानंतर पूर्णपणे बरे झाले असून त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Coronavirus Updates : देशभरातून कोरोनाच्या ४८ रुग्णांना डिस्चार्ज
SHARES
 देशभरातून कोरोनाची बाधा झालेले ४८ रुग्ण उपचारानंतर पूर्णपणे बरे झाले असून त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सोमवारपर्यंत ३५ रुग्णांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला होता. मंगळवारी डिस्चार्ज झालेल्या रुग्णांची संख्या १३ ने वाढली.


करोना व्हायरससंबंधी दररोज चिंता वाढवणाऱ्या बातम्या येत असताना ही दिलासा देणारी बातमी आहे. देशभरात करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५५० पेक्षा जास्त आहे. दररोज हा आकडा वाढत आहे. पण त्याचवेळी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या अनेक रुग्णांचे करोना चाचणीचे रिपोर्टही निगेटीव्ह येत आहेत. सरकारच्या उपायोजनांमुळे दुसऱ्या बाजूला करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्याही कमी होत आहे. 


संपूर्ण देशात केरळ पाठोपाठ महाराष्ट्रात करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या जास्त आहे. महाराष्ट्रात आठ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशातील कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री देशाला उद्देशून केलेल्या भाषणात संपूर्ण देशात २१ दिवसांसाठी लॉकडाउनची घोषणा केली. इटली, स्पेन, इराणमध्ये कोरोना व्हायरसमुळे जी स्थिती निर्माण झाली आहे, तशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 



हेही वाचा -

Coronavirus Updates : जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला बाजाराच्या वेळा ठरवून द्या - भाकप

Coronavirus Updates : आता १४ एप्रिलपर्यंत देशातील प्रवासी रेल्वेसेवा बंद



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा