Advertisement

कल्याण डोंबिवलीत ४८१ नवे रुग्ण, १० जणांचा मृत्यू

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात गुरूवारी कोरोनाचे ४८१ नवीन रुग्ण आढळले. तर १० जणांचा मृत्यू झाला.

कल्याण डोंबिवलीत ४८१ नवे रुग्ण, १० जणांचा मृत्यू
SHARES

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात गुरूवारी कोरोनाचे ४८१ नवीन रुग्ण आढळले. तर १० जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ५०८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ४०,४१२ झाली आहे. यामध्ये ४७३६ रुग्ण उपचार घेत असून ३४,८८१  रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यत ७९५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नवीन रूग्णांमध्ये कल्याण पूर्व ५१, कल्याण प १५६, डोंबिवली पूर्व १५९, डोंबिवली प ८३, मांडा टिटवाळा  १९, मोहना १२, तर पिसवली येथील १ रुग्णांचा समावेश आहे.

 डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी १२१ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, १८ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकुलमधून,  ११ रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय,  ११ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून, २ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड सेंटर येथून, ३ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.हेही वाचा -

कोरोना लशीच्या मानवी चाचणीला केईम रुग्णालयात सुरुवात

नाकावाटेही दिली जाऊ शकते कोरोना लस, सीरमकडून ट्रायलला सुरुवातRead this story in हिंदी
संबंधित विषय