Advertisement

राज्यात सोमवारी ४ हजार ८६९ नवीन कोरोना रुग्ण

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ४ कोटी ८३ लाख ५२ हजार ४६७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३ लाख १५ हजार ०६३ (१३.६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

राज्यात सोमवारी ४ हजार ८६९ नवीन कोरोना रुग्ण
SHARES

राज्यात सोमवारी कोरोनाचे नवीन ४ हजार ८६९  रुग्ण आढळले. तर ८ हजार ४२९  रुग्ण बरे झाले आहेत. तसंच दिवसभरात ९० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

राज्यातील मृत्यूदर २.०१ टक्क्यांवर स्थिरावला आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ६१ लाख ०३ हजार ३२५ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.६५ टक्के झाले आहे.

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ४ कोटी ८३ लाख ५२ हजार ४६७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३ लाख १५ हजार ०६३ (१३.६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४ लाख ६१ हजार ६३७ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, ३ हजार १०३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

सध्या राज्यात एकूण ७५ हजार ३०३ सक्रिय रुग्ण आहेत.  पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक १५ हजार ४७३ आहे. तर सांगलीत ७ हजार ७४४, साताऱ्यात ७ हजार ४१६, ठाणे जिल्ह्यात ६ हजार ०६८, अहमदनगरमध्ये ५ हजार ८५७ सक्रिय रुग्ण आहेत. 

मुंबई महापालिका हद्दीत सक्रिय रुग्णांची संख्या ५ हजार २७६ आहे. तर, रायगडमध्ये २ हजार ५५९, रत्नागिरीत २ हजार १४९, सिंधुदुर्गात १ हजार ८८८, नागपूर जिल्ह्यात १ हजार ७३९, नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ९३६ आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा