Advertisement

सीरम इन्स्टिट्यूटच्या आगीत ५ जणांचा मृत्यू

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या आगीत ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी प्रसारमाध्यांशी बोलताना दिली आहे.

सीरम इन्स्टिट्यूटच्या आगीत ५ जणांचा मृत्यू
SHARES

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या आगीत ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी प्रसारमाध्यांशी बोलताना दिली आहे. मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये बांधकाम मजूर असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शिवाय इमारतीला लागलेली आग देखील पूर्णपणे विझल्याचं सांगण्यात येत आहे.

मांजरी येथील सीरम इन्स्टिट्यूटमधील बीसीजी प्लांटमधील एका इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावर ही आग लागली असून आग चौथ्या आणि पाचव्या मजल्यापर्यंत पसरली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १० गाड्या त्वरीत  घटनास्थळी दाखल झाल्या. ज्या प्लांटमध्ये ही आग लागली आहे तिथं रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी घेतली जाणारी बीसीजी लस तयार केली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीरम इन्स्टिट्यूटला भेट दिली होती त्याच इमारतीत ही आग लागली. ज्या ठिकाणी कोरोना (coronavirus) प्रतिबंधक लस तयार होते, ते ठिकाण लांब असल्याचं सीरमकडून सांगण्यात आलं.

हेही वाचा- त्यांच्याकडे ही माहिती येते कशी? सीरमच्या आगीवरून मुख्यमंत्री संतापले

याआगीसंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांनी देखील महत्त्वाची माहिती दिली, ते म्हणाले की जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी २ वाजता इमारतीतील तिसऱ्या मजल्यावर वेल्डिंगचं काम सुरू असताना अचानक आग लागली. त्यानंतर जवळच्याच ज्वलनशील सामानामुळे आग मोठ्या प्रमाणात भडकली.

आगीची वर्दी मिळताच महापालिकेचे ५ टँकर आणि ३ पाण्याचे टँकर ताबडतोब घटनास्थळी नेण्यात आले. साधारण २ ते ३ तासानंतर आता आग पूर्णपणे विझली आहे. आग विझल्यानंतर आत जाऊन पाहिलं असता ५ मृतदेह सापडल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं, असंही राजेश टोपे म्हणाले.

या आगीमागे विरोधक घातपाताचा संशय व्यक्त करत आहेत, याबद्दल विचारलं असता उद्धव ठाकरे (uddhav thackeray) म्हणाले, त्यांच्याकडे ही माहिती कशी येते? सर्जिकल स्ट्राइक वैगेरे इतर गोष्टी कशा कळतात हे गुपित आहे. त्यांचं ज्ञान अगाध आहे. काही विद्या वैगेरे प्राप्त असेल, माहिती असेल तर जरुर द्यावी. त्यांना जरा संयमाची लस टोचण्याची गरज आहे, असं म्हणत त्यांनी विरोधकांना टोला हाणला.

(5 death in serum institute fire says rajesh tope)

हेही वाचा- सीरम इन्स्टिट्यूटमधील आगीवर अदर पुनावाला म्हणाले…

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा