Advertisement

महाराष्ट्र: 5 जिल्ह्यांमध्ये मलेरियाच्या शून्य रुग्णांची नोंद

भारत 2030 पर्यंत मलेरिया निर्मूलनासाठी काम करत असल्याने हा आकडा कमी झाला आहे.

महाराष्ट्र: 5 जिल्ह्यांमध्ये मलेरियाच्या शून्य रुग्णांची नोंद
(Representational Image)
SHARES

महाराष्ट्रात सलग दोन वर्षांपासून मलेरियाच्या घटनांमध्ये 20 टक्क्यांनी घट होत आहे, राज्याच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी अशी माहिती दिली आहे.  

राज्याच्या आरोग्य विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 2021 मध्ये 19,303 प्रकरणे आढळून आली होती. तर 2022 मध्ये ही संख्या 15,451 इतकी घसरली. वार्षिक प्रकरणांमध्ये 20% घट दर्शवते.

शिवाय, जानेवारी ते मे 2022 आणि 2023 या कालावधीतील प्रकरणांची तुलना देखील 20% कमी दर्शवते, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. या वर्षी मे महिन्यापर्यंत राज्यात मलेरियाचे २,५७१ रुग्ण होते.

मंगळवार, 6 जून रोजी प्रसिद्ध झालेल्या राज्य मलेरिया अहवालानुसार पाच जिल्ह्यांमध्ये (लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी आणि हिंगोली) शून्य रुग्ण आढळून आले आहेत.

दरम्यान, भंडारा, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, वर्धा, अहमदनगर, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, वाशीम, सांगली, बीड, सोलापूर, औरंगाबाद, जालना आणि यवतमाळ याठिकाणी या वर्षी आतापर्यंत एक ते 10 प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

अधिकाऱ्यांंनी सांगितले की, अनेक सार्वजनिक आरोग्य उपायांमुळे प्रकरणांमध्ये घट झाली आहे.



हेही वाचा

टाटा रुग्णालयात कर्करोगाच्या रुग्णांवर प्रोटॉन उपचार

रुग्णवाहिकेच्या सायरनचा आवाज बदलणार

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा