Advertisement

ठाण्यातील ५ खासगी रुग्णालयं कोरोनामुक्त

महापालिका प्रशासनाने शहरातील २४ खासगी रुग्णालये ताब्यात घेऊन त्यांना कोविड रुग्णालये म्हणून घोषित केले होते.

ठाण्यातील ५ खासगी रुग्णालयं कोरोनामुक्त
SHARES

ठाणे महापालिका क्षेत्रात आता कोरोना नियंत्रणात आल्याचं चित्र आहे. येथील रुग्णसंख्येत मोठी घट येऊ लागली आहे. त्यामुळे पाच खासगी रुग्णालयांची कोविड मान्यता पालिकेने रद्द केली आहे. आता या रुग्णालयांमध्ये इतर रुग्णांवरही उपचार केले जाणार आहेत. रुग्णसंख्या आटोक्यात आल्याने ठाण्यातील आणखी चार रुग्णालयांनी कोविड मान्यता रद्द करण्याची परवानगी महापालिकेकडे मागितली आहे.

महापालिका प्रशासनाने शहरातील २४ खासगी रुग्णालये ताब्यात घेऊन त्यांना कोविड रुग्णालये म्हणून घोषित केले होते. ठाणे महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांच्या संख्येत घट येत आहे.  रुग्ण नसल्यामुळे पाच रुग्णालयांची कोवीड मान्यता रद्द केली आहे.  यामध्ये काळशेकर, आरोग्यम, वेलम, स्वस्तिक आणि मॉ वैष्णवी या रुग्णालयांचा समावेश आहे.  या रुग्णालयांमध्ये आता इतर रुग्णांवर उपचार करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महापालिकेची ग्लोबल, कळवा आणि मुंब्य्रातील रुग्णालये सुरू राहणार आहेत.

ठाणे महापालिका क्षेत्रात आतापर्यंत ४७ हजार ९९८ कोरोना रुग्ण आढळले आहेत. यामधील ९४.५३ टक्के म्हणजेच ४५ हजार ३७२ रुग्ण बरे  होऊन घरी परतले आहेत. शहरात सध्या १५११ (३.१५ टक्के कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. 



हेही वाचा -

ठाण्यात रुग्ण दुपटीचा कालावधी २७२ दिवसांवर

लसीकरणाच्या माहिती संकलनासाठी 'ॲप'

मुंबईसह राज्यातील किमान तापमानात घट



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा