पनवेल महापालिका हद्दीत बुधवारी (११ नोव्हेंबर) ५२ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून ७० रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
पनवेल महापालिका हद्दीतील आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये पनवेलमधील ४, नवीन पनवेल ३, खांदा काॅलनी २, कळंबोली ६, कामोठे ४, खारघर येथील ३३ रुग्णांचा समावेश आहे.
बरे झालेल्या रूग्णांमध्ये पनवेलमधील पनवेल ५, नवीन पनवेल १३, कळंबोली १२, कामोठे १४, खारघर येथील २६ रुग्णांचा समावेश आहे.
आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण २४१९८ कोरोनाबाधित रूग्णांपैकी २३१५५ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून ५६३ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे ४८० ॲक्टीव्ह रूग्ण आहेत.
कोव्हॅक्सीन' लशीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सायन रुग्णालयात होणार
मुंबईतल्या सर्व दुकानात सीसीटिव्ही कॅमेरे लावणे सक्तीचे- मुंबई पोलिस