Advertisement

कल्याण डोंबिवलीत ५३७ नवीन कोरोना रुग्ण

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात बुधवारी नवीन ५३७ कोरोना रुग्ण आढळले. तर ५ जणांचा मृत्यू झाला.

कल्याण डोंबिवलीत ५३७ नवीन कोरोना रुग्ण
SHARES

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात बुधवारी नवीन ५३७ कोरोना रुग्ण आढळले. तर ५ जणांचा मृत्यू झाला. गेल्या २४ तासांत ४९६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ३६,६६८ झाली आहे. यामध्ये ५२३७ रुग्ण उपचार घेत असून ३०,६८७ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ७४४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नवीन रूग्णांमध्ये कल्याण पूर्व ६५, कल्याण प. १७७, डोंबिवली पूर्व १७१, डोंबिवली प ९१, मांडा टिटवाळा  १६, मोहना येथील १७ रुग्णांचा समावेश आहे.

डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी १४३ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, १० रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकुलमधून, ९ रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय, ९ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.हेही वाचा -

२ पेक्षा अधिक मजल्यांवर कोरोना रुग्ण आढळल्यास इमारत सील

मुंबईच्या 'या' परिसरात कोरोनामुळं सर्वाधिक मृत्यूRead this story in हिंदी
संबंधित विषय