Advertisement

कल्याण-डोंबिवलीत गुरूवारी ५६० नवे रुग्ण

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात गुरूवारी कोरोनाचे तब्बल ५६० नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे येथील रुग्णांची संख्या आता ७ हजारांच्या वर गेली आहे.

कल्याण-डोंबिवलीत गुरूवारी ५६० नवे रुग्ण
SHARES

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात गुरूवारी कोरोनाचे तब्बल ५६० नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे येथील रुग्णांची संख्या आता ७ हजारांच्या वर गेली आहे. कोरोनाचा फैलाव आटोक्यात आणण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात १० दिवसांचा लाॅकडाऊन घोषीत केला आहे.एकाच दिवशी पाचशेहून अधिक रुग्ण आढळल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.



गुरूवारी आढळलेल्या नवीन ५६० रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ७४८५ झाली आहे. तर आतापर्यत १२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ४२६८ रुग्ण उपचार घेत असून ३०९० रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.  कल्याण डोंबिवलीत मोठ्या प्रमाणात समूह संसर्ग होत असल्याने येथील कोरोनाची स्थिती हाताबाहेर गेली आहे. महानगर पालिकेची आरोग्य व्यवस्था अपुरी पडत असुन अशीच रूग्णांची संख्या रोज वाढत राहिल्यास नागरिक रस्त्यावरच तडफडून आपले प्राण सोडतील अशी भीती नागरिक व्यक्त करीत आहेत.


कल्याण डोंबिवलीमध्ये २९ जून रोजी रोजी ४३५ रुग्ण तर ३० जून रोजी ४६२ रुग्ण आढळले होते. १ जुलै म्हणजेच बुधवारी ३५० रुग्ण कल्याण डोंबिवलीत आढळले होते. कल्याण डोंबिवलीत पुन्हा एकदा लॉकडाउन करण्यात आला आहे. कोरोनाची साखळी मोडण्यासाठी १२ जुलैपर्यंत लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. 



मुंबईत गुरूवारी १५५४ नवे रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णांचा आकडा ८० हजार २६२ वर गेला आहे. तर गुरूवारी ५७ मृतांची नोंद करण्यात आली आहे. मृतांचा आकडा ४ हजार ६८६ वर पोहोचला आहे.  ५९०३ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण ५० हजार ६९४ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे.



हेही वाचा -

समुद्रात ८ दिवस मोठी भरती, मुंबईकरांना संतर्कतेचा इशारा

Covid-19 Test: महाराष्ट्रात १० लाख कोरोना चाचण्यांचा टप्पा पार





संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा