Advertisement

राज्यात बुधवारी कोरोनाचे ५७ हजार ६४० नवे रुग्ण

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,८३,८४,५८२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४८,८०,५४२ (१७.१९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

राज्यात बुधवारी कोरोनाचे ५७ हजार ६४० नवे रुग्ण
SHARES

राज्यात बुधवारी कोरोनाचे ५७ हजार ६४० नवे रुग्ण आढळले. तर  ५७ हजार ६ रुग्ण बरे झाले. मृतांचा आकडा मात्र वाढला आहे. २४ तासांत राज्यात ९२० मृतांची नोंद झाली आहे.

कोरोना रुग्णांचा एकूण आकडा ४८ लाख ८० हजार ५४२ झाला आहे.  यापैकी ६ लाख ४१ हजार ५९६ रुग्णांवर उपचार सुरू असून ४१ लाख ६४ हजार ९८ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. तर, आतापर्यंत ७२ हजार ६६२ मृत्यू झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण  ८५.३२ टक्के झाले आहे.सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९ टक्के आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,८३,८४,५८२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४८,८०,५४२ (१७.१९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३८,५२,५०१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर ३२,१७४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ६ लाख ४१ हजार ५९६ इतकी झाली आहे.  पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक १ लाख १४ हजार २५४ आहे. मुंबई पालिका हद्दीत हा आकडा ५६ हजार १५३ इतका आहे. ठाणे जिल्ह्यात सध्या ४४ हजार ७१६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर नागपूर जिल्ह्यात ही संख्या ५८ हजार ९४४ इतकी झाली आहे. नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ४६ हजार ५४१ इतकी आहे.



हेही वाचा

  1. एक प्रकारे छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राला मार्गदर्शनच- उद्धव ठाकरे
Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा