Advertisement

104 डॉक्टर्सवर राज्य सरकारची कारवाई


104 डॉक्टर्सवर राज्य सरकारची कारवाई
SHARES

मुंबई - राज्य सरकाराने नियुक्त केलेले डॉक्टर काम मिळाले की कामावर येत नसल्याचे उघड झाले असून, यातील 581 फरार डॉक्टर्सपैकी 104 डॉक्टर्सवर कारवाई करत काढून टाकण्यात आले आहे. अशा डॉक्टर्सच्या मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव मेडिकल कॉन्सिलला दिल्याची माहिती आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी दिली. नव्या वर्षात ग्रामीण भागात आरोग्य सेवा मजबूत करण्याचा प्रयत्नही करण्यात आला. त्यामध्ये बालमृत्यू आणि माता मृत्यूचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्नही करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच राज्यात 72 ठिकाणी सब-सेंटर्स सुरु करत यात काही आदिवासीबहुल भागही असल्याचं त्यांनी सांगितलं. आदिवासी भागातील 350 मांत्रिकांना आरोग्यकेंद्राचे महत्त्व पटवून दिल्याच सांगत त्यांनी जर अशक्त बाळांना आरोग्य केंद्रात आणले तर त्यांना प्रत्येक बाळामागे 200 रुपये दिले जातील अशी माहितीही त्यांनी दिली. एमडी आणि एमएसला डॉक्टर्सपदाच्या रिक्त 545 जागा 3 महिन्यात भरल्या जाणार आहेत तसेच ट्रॉमा केयर, सब डिस्ट्रीक हॉस्पिटल आणि सिव्हिल हॉस्पिटलमधील 1032 जागा तीन महिन्यांत भरल्या जातील असंही त्यांनी सांगितलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा