Advertisement

राज्यात कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट, ६१ हजार रुग्ण बरे

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्यात कडक लाॅकडाऊन लागू करण्यात आला आहे. मात्र, तरीही राज्यात मागील काही दिवस रोज ६० हजारांच्या आसपास रुग्ण आढळत होते.

राज्यात कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट, ६१ हजार रुग्ण बरे
SHARES

कोरोना रुग्ण संख्येबाबत राज्याला सोमवारी मोठा दिलासा मिळाला आहे. नवीन रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर घटली आहे. ३७ हजार ३२६ नवे रुग्ण सापडले आहेत. तर ६१ हजार ६०७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं आहे

मुंबईत सोमवारी १७९४ रुग्ण आढळले आहेत. तर ३५८० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्यात कडक लाॅकडाऊन लागू करण्यात आला आहे. मात्र, तरीही राज्यात मागील काही दिवस रोज ६० हजारांच्या आसपास रुग्ण आढळत होते. सोमवारी मात्र महिन्याभरानंतर रुग्णसंख्या ४० हजारांच्या खाली आली आहे. 

राज्यात आतापर्यंत एकूण ४४ लाख ६९ हजार ४२५ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढते असून सध्या हे प्रमाण ८६.९७ टक्के इतके झाले आहे. राज्यात  सोमवारी  ५४९ रुग्ण दगावले असून राज्यातील मृत्यूदर १.४९ टक्के इतका आहे. 

आतापर्यंत करोनाच्या २ कोटी ९६ लाख ३१ हजार १२७ चाचण्या पूर्ण करण्यात आल्या असून त्यातील ५१ लाख ३८ हजार ९७३ चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. हे प्रमाण १७.३४ टक्के इतके आहे. सध्या राज्यात ३६ लाख ७० हजार ३२० व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर २६ हजार ६६४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.



हेही वाचा -

आठवड्याभरात 'इतक्या' पोलीसांना कोरोनाची लागण

  1. धक्कादायक! पतीच्या संशयावरुन पत्नीची ट्रेन खाली आत्महत्या
Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा