Advertisement

राज्यात गुरूवारी ६२ हजार १९४ नवे रुग्ण

गेल्या काही दिवसांपासून राज्यात ६० हजारांखाली रुग्ण सापडत होते. मात्र, पुन्हा ६० हजारांचा आकडा पार केल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

राज्यात गुरूवारी ६२ हजार १९४ नवे रुग्ण
SHARES

राज्यात गुरूवारी कोरोनाचे नवीन ६२ हजार १९४ रुग्ण आढळले. तर ८५३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  गेल्या काही दिवसांपासून राज्यात ६० हजारांखाली रुग्ण सापडत होते. मात्र, पुन्हा ६० हजारांचा आकडा पार केल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

गुरूवारी ६३ हजार ८४२ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. आतापर्यत ४२ लाख २७ हजार ९४० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ८५.५४ टक्के आहे. तर सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९ टक्के आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ८६ लाख ६१ हजार ६६८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४९ लाख ४२ हजार ७३६ नमुने पॉझिटीव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३८ लाख २६ हजार ८९ व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत तर, २९ हजार ४०६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइमध्ये आहेत.

दरम्यान, गुरूवारी मुंबईत ३ हजार ५६ कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर ३ हजार ८३८ रुग्णांना घरी सोडण्यात आलं आहे. ६९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  आतापर्यंत मुंबईत ६ लाख २ हजार ३८३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर १३ हजार ६१६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत ५० हजार ६०६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.



हेही वाचा

मास्कविना फिरणाऱ्यांकडून ५४ कोटींचा दंड वसूल

मुंबईत पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत पुन्हा वाढ

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा