Advertisement

राज्यात शनिवारी कोरोनाचे नवीन ६३ हजार २८२ रुग्ण

राज्यात आजपर्यंत एकूण ३९,३०,३०२ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ८४.२४ टक्के झाले आहे.

राज्यात शनिवारी कोरोनाचे नवीन ६३ हजार २८२ रुग्ण
SHARES

राज्यात शनिवारी कोरोनाचे नवीन ६३ हजार २८२ रुग्ण आढळले. तर  ८०२ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर १.४९ टक्के एवढा आहे.

याशिवाय  ६१ हजार ३२६ रुग्ण बरे  झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ३९,३०,३०२ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ८४.२४ टक्के झाले आहे. रुग्ण बरे होण्याचा एकूण आकडा ३९ लाख ३० हजार ३०२ इतका झाला आहे. ४० लाख ४३ हजार ८९९ लोकं होम क्वारंटाइन असून २६ हजार ४२० संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

मुंबईत शनिवारी कोरोनाचे ३९०८ नवीन रुग्ण आढळले. तर ५९०० रुग्ण बरे झाले आहेत. मागील काहील दिवसांपासून मुंबईत नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. 

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,७३,९५,२८८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४६,६५,७५४ (१७.०३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४०,४३,८९९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २६,४२० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ६,६३,७५८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.



हेही वाचा - 

सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास १२०० रुपये दंड

१८-४४ वयोगटातील व्यक्तीचं लसीकरण पालिकेच्या 'या' ५ केंद्रातच, पण...

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा