Advertisement

राज्यात मंगळवारी ६५ हजार ९३४ रुग्ण बरे

गेल्या तीन आठवड्यांमध्ये पहिल्यांदाच राज्यात कोरोनामुळे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या नवीन रुग्णांपेक्षा जास्त झाली आहे

राज्यात मंगळवारी ६५ हजार ९३४ रुग्ण बरे
SHARES

मंगळवारी राज्यात कोरोनाचे नवीन ५१ हजार ८८० रुग्ण आढळले आहेत. तर तब्बल ६५ हजार ९३४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातला रिकव्हरी रेट ८५.१६ टक्के इतका झाला आहे. 

गेल्या तीन आठवड्यांमध्ये पहिल्यांदाच राज्यात कोरोनामुळे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या नवीन रुग्णांपेक्षा जास्त झाली आहे. आतापर्यंत राज्यात एकूण ४८ लाख २२ हजार ९०२ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे.  त्यापैकी ४१ लाख ७ हजार ०९२ रुग्ण बरे झाले आहेत. राज्याती सध्या ६ लाख ४१ हजार ९१० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

 पुणे जिल्ह्यात अॅक्टिव्ह  रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुण्यात एकूण १ लाख ०९ हजार ५३१ इतके रुग्ण आहेत. मुंबई पालिका हद्दीत हा आकडा ५६ हजार ४६५ इतका आहे. ठाणे जिल्ह्यात सध्या ४५ हजार ५१६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर नागपूर जिल्ह्यात ही संख्या ६४ हजार ५५४ इतकी झाली आहे. नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ४५ हजार ६०५ इतकी आहे.

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ८१ लाख ०५ हजार ३८२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४८ लाख २२ हजार ९०२ (१७.१६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३९ लाख ३६ हजार ३२३ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, ३० हजार ३५६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

  


हेही वाचा -

  1. मुंबईतील बेघरांचंही लसीकरण करणार- महापौर

  1. आता Whatsapp वर मिळवा लसीकरण केंद्रांची माहिती, जाणून घ्या प्रक्रिया
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा