Advertisement

मुंबईतील बेघरांचंही लसीकरण करणार- महापौर

घरोघरी जाऊन लसीकरण करता यावं, यासाठीही नियोजन करण्यात येत आहे. जास्तीत जास्त मोबाइल व्हॅन्सची तयारी केली जात आहे, अशी माहिती देखील महापौरांनी दिली.

मुंबईतील बेघरांचंही लसीकरण करणार- महापौर
SHARES

मुंबईत हजारोंच्या संख्येने बेघर आहेत, आधार कार्ड नसलेल्यांची संख्याही मोठी आहे. अशा व्यक्तींचं लसीकरण झालं नाही, तर कोरोनाचं संक्रमण सुरूच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा लोकांचंही पुढाकार घेऊन लसीकरण करण्यात येईल, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (kishori pednekar) यांनी दिली.

घरोघरी जाऊन लसीकरण करता यावं, यासाठीही नियोजन करण्यात येत आहे. जास्तीत जास्त मोबाइल व्हॅन्सची तयारी केली जात आहे, अशी माहिती देखील महापौरांनी दिली.

प्रसारमाध्यमांशी बोलताना महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईतील लसीकरणाच्या कार्यक्रमाची माहिती दिली. त्या म्हणाल्या की, सध्याच्या स्थितीत मुंबई महापालिकेला (bmc) अत्यंत कमी प्रमाणात कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध होत आहेत. त्यामुळे १८ ते ४४ वयोगटातील, ४५ वर्षांपुढील नागरिक तसंच लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना लस देण्यासाठी मुंबई महापालिकेला तारेवरची कसरत करावी लागत आहे. 

हेही वाचा- कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात कडक लाॅकडाऊन!

याेग्य नियोजन करून टप्प्याटप्प्याने सर्वांना लस देण्यात येत आहे. १८ ते ४४ वयोगटासाठी ठराविक केंद्रांवरच लस देण्यात येत आहे. तर दुसरा डोस घेणाऱ्या ४५ वर्षांपुढील नागरिकांना लसीकरणात प्राधान्य देण्यात येत आहे. अशी ५९ केंद्र आहेत. मुंबईत कुठल्या केंद्रांवर लसीकरण होईल, याची माहिती मुंबईकरांना (mumbai) आधीच देण्यात येत आहे. काेविन अॅपवर नोंदणी करून मेसेज आल्यावरच लसीकरण केंद्रांवर येण्याचं आवाहन सातत्याने केलं जात आहे, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

मुंबईत ज्या प्रकारे मागील काही दिवसांपासून निर्बंधांचं पालन करण्यात येत आहे, त्यामुळे हळुहळू कोरोनाबाधित (coronavirus) रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. मुंबईत असे अनेक घटक आहेत, ज्यांकडे आधारकार्ड व तत्सम पुरावे नाही, असंख्य लोकं बेघर आहेत, स्थलांतरीत मजूर आहेत, अशा सर्वांचं लसीकरण करण्यात येईल. जेणेकरून कोरोनाला आळा घालता येईल, असं किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केलं.


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा