Advertisement

राज्यात गुरूवारी ६६ हजार नवे रुग्ण

राज्यात गुरुवारी कोरोनाचे नवीन ६६ हजार १५९ रुग्ण आढळले. तर ७७१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात गुरूवारी ६६ हजार नवे रुग्ण
SHARES

राज्यात गुरुवारी कोरोनाचे नवीन  ६६ हजार १५९ रुग्ण आढळले. तर ७७१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान,  ६८ हजार ५३८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे.  बुधवारी ही संख्या ६७ हजार ७५२ इतकी होती. तर निदान झालेल्या रुग्णांची संख्या ६३ हजार ३०९ इतकी होती. बरे झालेल्या रुग्णांचा आकडा अधिक असल्याने दिलासा मिळाला आहे. 

राज्यात आतापर्यंत ३७ लाख ९९ हजार २६६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या राज्यात ८३.६९ टक्के रिकव्हरी रेट आहे. तर १.५ टक्के मृत्यूदर आहे. एकूण २ कोटी ६८ लाख १६ हजार ७५ अहवालांपैकी आतापर्यंत ४५ लाख ३९ हजार ५५३ अहवाल पॉझिटीव्ह निघाले आहेत. सध्या राज्यात १६.९३ टक्के पॉझिटीव्हिटी रेट आहे. सध्या ४१ लाख १९ हजार ७५९ लोक गृह विलगीकरणात आहेत तर २० हजार ११८ लोक संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

दरम्यान, कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने राज्यात सुरू असलेला लॉकडाउन १५ मे पर्यंत वाढवला आहे. राज्य सरकारने यासंदर्भात आदेश काढला आहे. राज्यात लागू असलेले निर्बंध १५ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत लागू असणार आहेत. हेही वाचा -

कोविन अॅपवर नोंदणी करणाऱ्यांनाच लस मिळणार - किशोरी पेडणेकर

परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ, भ्रष्टाचार आणि ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा