Advertisement

नवी मुंबईत गुरूवारी कोरोनाचे नवीन ६७ रुग्ण

नवी मुंबईत गुरूवारी (३१ डिसेंबर) कोरोनाचे नवीन ६७ रुग्ण सापडले आहेत. तर १ रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

नवी मुंबईत गुरूवारी कोरोनाचे नवीन ६७ रुग्ण
SHARES

नवी मुंबईत गुरूवारी (३१ डिसेंबर) कोरोनाचे नवीन ६७ रुग्ण सापडले आहेत. तर १ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्णांची संख्या आता ५१ हजार ००२ झाली आहे. 

गुरूवारी नवी मुंबईमध्ये आढळलेल्या रुग्णांमध्ये बेलापूर १९, नेरुळ ७, वाशी ५, तुर्भे १, कोपरखैरणे ६, घणसोली १५, ऐरोली १२ , दिघा येथील २ रुग्णांचा समावेश आहे. तर ८८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. 

बेलापूर २२, नेरुळ २३, वाशी ७, तुर्भे १३, कोपरखैरणे ५, घणसोली ५, ऐरोली १२,  दिघा येथील १ रुग्ण बरे होऊन घरी गेले. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४९,०६० झाली आहे. तर मृतांचा आकडा १०५१ झाला आहे. नवी मुंबईत सध्या ८९१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर कोरोनामुक्तीचा दर ९६ टक्के झाला आहे. 

नवी मुंबईत दिवाळीनंतर कोरोना रुग्णांत वाढ झाली होती. त्यामुळे ३५२ दिवसांवर गेलेला रुग्णदुपटीचा कालावधी कमी होत २६५ दिवसांवर आला होता. मात्र, आता मागील काही दिवसांपासून रुग्णांची संख्या पुन्हा कमी झाली आहे. त्यामुळे रुग्णदुपटीचा कालावधी ६१६ दिवस म्हणजे एक वर्ष सहा महिन्यांपर्यंत गेला आहे.पालिकेने शहरातील सर्व विभागांत उभारलेली १२ काळजी केंद्र टप्प्याटप्प्याने बंद केली आहेत.



हेही वाचा -

जानेवारी ते नोव्हेंबर २०२० पर्यंत रेल्वेच्या हद्दीत ३५ हजार गुन्ह्यांची नोंद

सिद्धिविनायक मंदिराच्या दर्शन क्षमतेत वाढ



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा