Advertisement

राज्यात बुधवारी कोरोनाचे नवीन ६ हजार ८५७ रुग्ण

राज्यात सध्या ८२ हजार ५४५ सक्रीय रुग्ण आहेत. पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक १५ हजार ७६८ आहे.

राज्यात बुधवारी कोरोनाचे नवीन ६ हजार ८५७ रुग्ण
SHARES

राज्यात बुधवारी कोरोनाचे नवीन ६ हजार ८५७ रुग्ण आढळले. तर ६ हजार १०५  रुग्ण बरे झाले आहेत. तसंच २८६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यातील मृत्यूदर २.०१ टक्क्यांवर गेला आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६० लाख ६४ हजार ८५६ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.५३ टक्के झाले आहे.

राज्यात सध्या ८२ हजार ५४५ सक्रीय रुग्ण आहेत. पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक १५ हजार ७६८ आहे. ठाणे जिल्ह्यात ९ हजार ५८७ रुग्ण तर कोल्हापूर जिल्ह्यात ८ हजार ७०८  सक्रीय रुग्ण आहेत. सांगलीत ही संख्या ८ हजार ८४४ इतकी आणि साताऱ्यात ७ हजार ०८९ आहे. अहमदनगरमध्ये ४ हजार ७०९, रायगडमध्ये २ हजार ०२२, रत्नागिरीत १ हजार ९९६, सिंधुदुर्गात १ हजार ९०१, नागपूर जिल्ह्यात १ हजार ७४९, नाशिकमध्ये ७३५ सक्रीय रुग्णांची संख्या आहे.

औरंगाबादमध्ये ४९१, नांदेडमध्ये ४४०, जळगावमध्ये ५४५, अमरावतीत ११० सक्रीय रुग्ण आहेत.  सर्वात कमी सक्रिय रुग्णांची संख्या यवतमाळ जिल्ह्यात ६ आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा